माझ्या संपादकीय कारकिर्दीतील काही फुले, काही काटे
आज अनेक संपादक आहेत. त्यापैकी बहुतेक जण शब्दांचे सौदागर आहेत. कुणाचे तरी शब्द स्वस्तात विकत आणावेत आणि कुणाच्या तरी ते गळ्यात मारावेत असा हा साधा व्यापार आहे. पुष्कळ संपादकांना शब्द प्रसन्नच नाहीत. पुष्कळजण लिहीतच नाहीत आणि त्यांनी लिहिलं तरी फारसं कोणी वाचीतही नाहीत. कोळशाची किंवा बर्फाची वखार काढावी तशा पुष्कळांनी शब्दांच्या वखारी काढल्या. म्हणून त्या शब्दांना रेखीव असा काही अर्थच नसतो.......